राज्यात पावसाचा जोर ओसरणार पण…; हवामान विभागाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने (Rain) धुमाकुळ घातला आहे. सतत कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला होता. मात्र, येत्या दोन दिवसात पावसाचा जोर ओसरणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
येत्या दोन दिवसात पावसाचा जोर ओसरणार असला तरी हे दोन दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. या दिवसात अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर राज्यात वरूणराजा नागरिकांना दिलासा देण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसात मुंबई (Mumbai) व पुण्यात (Pune) सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुढचे दोन दिवस रायगड व पालघर जिल्ह्यात मात्र रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागात पावसाचा जोर कमी होत असताना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
दरम्यान, सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तर पुणे वेधशाळेने कोकण किनारपट्टी व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
गळती थांबेनाच! उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का
“दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत, 165 आमदारांचं पाठबळ तरी… ”
ललित मोदी अन् अभिनेत्री सुष्मिता सेनचं झालं लग्न?, खासगी फोटो व्हायरल
मोठी बातमी! अनिल परब यांच्या अडचणीत वाढ
“महाराष्ट्राला 18 तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले”
Comments are closed.