बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गेल्या 10 दिवसांपासून जळतंय ओडिसाचं जंगल; हजारो प्राण्यांच्या जिवाला धोका

भुवनेश्वर | वाढत्या तापमान वाढीमुळे मागील जंगलात आग लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. मागील वर्षी अॅमेझाॅनच्या जंगलात मोठी आग लागली होती. यात हजारो प्राणी, पक्षी आणि वनस्पती जळून खाक झाले होते. तर ऑस्ट्रेलियाच्या जंगलात सुद्धा मोठ्या् प्रमाणात आग लागली होती. तर शहरांच्या मुख्य भागात देखील अचानक आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. आता ओडिसाच्या जंगलात मोठी आग लागल्याची दृष्य समोर येत आहेत.

ओडिसा राज्यातील मयुरभंग जिल्हातील सिमलीपाल नॅशनल पार्कमध्ये मोठी आग लागली आहे. मागील 10 दिवसांपासून हे नॅशनल पार्कचे जंगल आगीच्या वणव्यात पेटत आहे. 10 दिवस झाले तरी देखील ही आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे या जंगलातील 3000 पेक्षा जास्त वनस्पती आणि 400 हून अधिक प्रकारच्या प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

सिमलीपाल नॅशनल पार्क परिसर 1060 चौरस मीटर क्षेत्रात पसरलं आहे. या जंगलात 3000 हून अधेिक प्रकारच्या वनस्पती आहेत. तर 94 प्रकारच्या एकट्या ऑर्किडच्या प्रजाती आहेत. त्याचबरोबर 94 प्रकारचे सरपटनारे प्राणी आणि 12 प्रकारचे जलचर प्राणी आहेत. 264 प्रकारचे पक्षी आणि 42 प्रकारचे सस्तन प्राणी आहेत.

दरम्यान, या जंगलात 1000 हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. तर 250 फाॅरेस्ट गार्ड देखील कामास लागले आहेत. ही आग जंगलाच्या मुख्य भागात लागली नसून जंगलाच्या बफर झोनमध्ये लागली असल्याची माहिती या नॅशनल पार्कच्या सुरक्षा रक्षकांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

लालूंच्या सुरक्षा रक्षकांनी पळवल्या गाद्या आणि उशा; रुग्णालयाची पोलिसांत धाव

पुण्यात मनसेने केक कापून साजरा केला कोरोनाचा वाढदिवस!

‘भाजपमध्ये प्रवेश केला हे चांगलं आहे, पण…’; मिथुन चक्रवर्ती आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात जुंपली

देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाचा घात केलाय- नाना पटोले

‘मेल्यावर साहेबांना काय सांगू?’; ‘या’ शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More