बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विराट कोहलीचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय योग्यच”

मुंबई | भारताचा कर्णधार विराट कोहली टी-20 क्रिकेट प्रकारातील कर्णधारपद विश्वचषकानंतर सोडणार आहे. खुद्द कोहलीने याबाबत सोशल माध्यमांवर माहिती दिली. त्यानंतर क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे. विराटच्या निर्णयानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच आता ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने विराटच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि माजी स्पिनर ब्रॅड हाॅजने विराट कोहलीचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. विराट कोहली भारतीय संघासाठी एकदिवसीय, कसोटी आणि टी ट्वेटी या तिन्ही प्रकारात नेतृत्व करतो. त्यामुळे त्याच्यावर जबाबदारीसह दबाव देखील असतो. विराटने चांगली कामगिरी केली असती तर विराट आयसीसी प्लेअर ऑफ द मन्थ ठरला असता, असंही ब्रॅड हाॅजने म्हटलं आहे.

जेव्हा तुमच्याकडून काही घडत नाही, तेव्हा चौफेर टीका होत असते. मात्र विराट दबावाखाली खेळत नाही. आता विराटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी विराटला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. आता विराटला वर्ल्डकप जिंकण्याची सुवर्णसंधी आहे, असंही ब्रॅड हाॅज म्हणाला.

दरम्यान, विराट कोहलीने भारतीय संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर आता विराट कोहली आरसीबी संघाचं कर्णधारपद सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत विराटला आयपीएल ट्राॅफी जिंकवून देता न आल्यानं तो कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“नवज्योत सिंग सिद्धू म्हणजे पॉलिटिक्समधील राखी सावंत”

मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, मी माझी भूमिका मांडली आता… – रामदास आठवले

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन होणार ‘या’ वेळेत, मंडळांनी दिली माहिती!

‘पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षात आणण्याची योग्य वेळ नाही’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं कारण

पोरांनो तयारीला लागा! पोलीस भरतीची तारीख जाहीर, वाचा संपूर्ण माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More