नवी दिल्ली | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग मंदावला आहे. असं असताना वैज्ञानिक मंडळी आता चौथ्या लाटेचं गणित मांडू लागले आहेत. देशात कोविडची पुढची म्हणजे चौथी लाट येण्याची शक्यता कमी राहिल, असं प्रख्यात व्हायरोलॉजिस्ट आणि वेल्लोर-आधारित ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधील माजी प्राध्यापक डॉ टी जेकब यांनी शनिवारी सांगितलं.
वृत्तसंस्थेशी एका खास मुलाखतीत बोलताना डॉ जॉन म्हणाले, “चौथ्या कोविड-19 लाटेची शक्यता कमी आहे, परंतु असं होणार नाही असं कोणीही सांगू शकत नाही.”
डॉ जॉन म्हणाले कोरोनाच्या चौथ्या लाटेचा अंदाज लावण्याचं कोणतंही वैज्ञानिक महामारीशास्त्रीय कारण नाही असं कोणीही सांगू शकणार नाही. पण या प्रकरणात लक्ष ठेवणं आणि सतर्क राहणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
गणितीय मॉडेलिंगवर आधारित COVID-19 लाटेचा अंदाज लावण्यावर माझा विश्वास नाही. पण मी तुम्हाला संगणकातील टाइप 2 पोलिओ लसीच्या गणितीय मॉडेलिंगच्या समस्यांबद्दल सांगितलं आहे.
डॉ जॉन पुढे म्हणाले, लोकांना एक गोष्ट समजत नाही ती म्हणजे ओमिक्रॉन व्हेरिएंट येण्याची अपेक्षा कोणालाच नव्हती. हे अल्फा, बीटा, गामा,डेल्टा, कप्पावरून आले नाही, परंतु ओमिक्रान अज्ञात मार्गा किंवा उत्परिवर्तनामुळे उद्भवणारा प्रकार अधिक वेगाने पसरत असेल.
थोडक्यात बातम्या-
दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
पुतिन यांनी 1 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, धक्कादायक कारण समोर
“आमचे आमदार फुटणार नाहीत, कुणी फुटलाच तर…””
“मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, लोकांच्या आग्रहास्तव…”
‘या’ भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता, हवामान विभागाचा गंभीर इशारा
Comments are closed.