मुंबई | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग मंदावला आहे. असं असताना वैज्ञानिक मंडळी आता चौथ्या लाटेचं गणित मांडू लागले आहेत. भारतात कोविडची पुढची म्हणजेच चौथी लाट 22 जूनच्या आसपास येईल आणि ती 24 ऑक्टोबरपर्यंत राहील असं आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आयआयटी संशोधकांनी यापूर्वी कोरोना लाटेसंदर्भात लावलेले सर्व अंदाज आत्तापर्यंत खरे ठरले आहेत. कोविडची चौथी लाट 4 महिन्यांपर्यंत चालेल असं देखील वैज्ञानिकांनी म्हंटलं आहे.
ओमिक्रॉन नंतरची ही चौथी लाट किती घातक असेल हे नवीन प्रकार आणि किती लोकांचे लसीकरण झालं आहे, तसेच किती लोकांना बूस्टर डोस मिळाला आहे, यावर अवलंबून असेल, असही वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोना रूग्ण संख्या कमी होत असतानाच तिसरी लाट हलकी पडत चालली आहे. आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी पुढील लाटेच्या वेळेचं कॅलक्युलेशन केलं आहे.
थोडक्यात बातम्या –
Holi 2022: होळीच्या दिवशी घरच्या घरी बनवा हर्बल रंग; जाणून घ्या पद्धत
पोलीस भरती पदासाठी तब्बल ‘इतक्या’ हजार जागा, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
“रोहित माझा कॅप्टन नाही, विराट कोहलीला कॅप्टन बनवा”
देव तारी त्याला कोण मारी ,मृत्युच्या दाढेतून वाचले महिलेचे प्राण, पाहा व्हिडीओ
‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच’; नाना पटोलेंच्या नव्या दाव्यानं खळबळ
Comments are closed.