बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! फळविक्रेत्याच्या मुलाने टाकला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

नवी दिल्ली | आयपीएलने आतापर्यंत भारतीय क्रिकेट जगताला अनेक मौल्यवान खेळाडू दिले आहेत. सामान्य परिस्थितीवर मात करत भारतीय संघाकडून खेळण्याचं स्वप्न प्रत्येकजण पहात असतो. आयपीएल ही प्रतिभा तपासणारी सर्वोत्तम स्पर्धा समजली जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये भारताला एक वेगवान गोलंदाज सापडला आहे. उमरान मलिकने सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे.

वाईल्ड कार्ड द्वारे आयपीएलमध्ये मलिकची एंट्री झाली आहे. शेवटच्या दोन सामन्यात उमरान मलिकला हैदराबाद संघाने आपल्या अंतिम 11 जणांमध्ये सामील केलं होतं. उमरान मलिकने आपल्या वेगाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीसुद्धा मलिकच्या वेगाचा चाहता झाला आहे. मलिक हा मुळचा जम्मू काश्मिरचा रहिवाशी आहे.

उमरान मलिकचे वडील फळविक्रेते आहेत. त्यांनी अत्यंत गरीब परिस्थितीत मलिकला क्रिकेट खेळण्यास पाठिंबा दिला आहे. जम्मू काश्मिर सारख्या भारताच्या महत्वाच्या पण सतत दहशतवादाच्या सावटाखाली वावरणाऱ्या वातावरणात मलिक क्रिकेट खेळत आला आहे. मलिकने बंगळूरचा सलामीवीर देवदत्त पडिकलला 153 कि.प्रती तास वेगाने चेंडू टाकला आहे. हा चेंडू आतापर्यंतचा या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू आहे.

दरम्यान, सनराईझर्स हैदराबाद संघाने उमरान मलिकला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. पण आतापर्यंत पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. शेवटच्या सामन्यांमध्ये हैद्राबादने उमरानला संधी दिली आणी उमराननं त्या संधीचे सोने केलं आहे. सर्वस्तरातून उमरान आणि त्याच्या परिवाराचं अभिनंदन केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या 

राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील ‘या’ संघाच्या पराभवामुळे होणार मुंबई इंडिअन्सला फायदा!

ह्रतिक रोशनने आर्यनला दिलेल्या पाठिंब्यामुळं कंगना भडकली; म्हणाली…

मोठी बातमी! ड्रग्स बाळगण्याप्रकरणी आर्यन खानला ‘इतक्या’ दिवसाची न्यायालयीन कोठडी

“मंदिरं उघडली आणि भाजपचा ढोंगी चेहरा समोर आला”

मोहन डेलकरांच्या कुटुंबियांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More