बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! कोंबडा गेल्यावर मालकाने वाजत-गाजत काढली अंत्ययात्रा

नांदेड | माणूस धोका देईल पण प्राण कधीही धोका देत नाहीत. काहीजण प्राण्यांचे इतके शौकीन असतात की ते आपल्या पाळलेल्या प्राण्याला लेकराप्रमाणे जीव लावतात. माणसाप्रमाणे त्यांच्यावर वेळेवर जेवण, उपचार करतात. परंतू त्या प्राण्याचं अचानकपणे जाणं मालकाच्या जीवाला चटका लावून जाणारं असतं. अशाच प्रकारे नांदेडमधील एका मालकाने आपल्या पाळलेला कोंबडा मेल्यावर त्याची अंत्ययात्रा काढली आहे.

नांदेडमधील मुखेड तालुक्यातील सावरगाव माळ या गावातील शंकर कोकले यांनी एक कोंबडा पाळला होता. त्यांच्या कोंबड्याचं नाव राजा असं होतं. गेल्या दहा वर्षापासून कोकले यांनी हा कोंबडा पाळला होता. महत्त्वाचं म्हणजे या कोंबड्यावर गावकऱ्यांचंदेखील विशेष प्रेम होतं. मात्र त्या कोंबड्याचा मांजराने चावा घेतला.

माजंराने चावल्यामुळे कोंबडा आजारी पडला. कोकले यांनी कोंबडा बरा होण्यासाठी उपचार केले मात्र उपचार करूनही कोंबड्याचा मृत्यु झाला. शंकर कोकले यांनी आपल्या आवडत्या कोंबड्याची अंत्ययात्रा काढली आणि त्याच्यावर विधीप्रमाणे अंत्यसंस्कारही केले.

दरम्यान, गावकऱ्याचंही या कोंबड्यावर विशेष प्रेम होतं त्यामुळे गावकरीही कोंबड्याच्या अंत्ययात्रेला हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यात या गोष्टीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत होती. कोंबड्याची अंत्ययात्रा काढल्यामुळे व्हिडीओ व्हायरल होत आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईतील कोरोना आला आटोक्यात, वाचा आजची आकडेवारी

‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारच करणार’

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

घरात-दुकानात पाणी शिरलेल्यांना ‘इतक्या’ हजारांची मदत; ठाकरे सरकारचा निर्णय

“जनतेचं म्हणणं ऐकून घेणं हे कर्तव्य आहे, ते पार पडलं पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More