मोठी बातमी! भाजपच्या विद्यमान आमदारांचं भविष्य धोक्यात?

BJP | विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून राजकीय घडामोडींना वेग आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीकडून सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला सर्व्हे दाखवून जास्त जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. आता विधानसभेला देखील भाजप असंच काहीसं करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र यामुळे आता भाजपच्या (BJP) विद्यमान आमदारांचं भविष्य धोक्यात येणार आहे.

विद्यमान आमदारांचं भविष्य धोक्यात

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यासाठी विद्यमानदारांना सर्व्हेला तोंड द्यावं लागणार आहे. सर्व्हेची टांगती तलवार आमदारांवर असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि संघाकडून आणखी दोन सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणानंतरच विद्यमान आमदारांमध्ये कोणाला उमदेवारी द्यायची आणि कोणाचा पत्ता कट करायचा यावर निर्णय होणार आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांमध्ये आता सर्व्हेची धास्ती लागून राहिली आहे.

BJP च्या विद्यमान आमदारांचं सर्वेक्षण होणार

याआधी देखील भाजपकडून एक उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदारांचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. मात्र, या सर्वेक्षणामध्ये बहुतांश आमदारांची कामगिरी असमाधानकारक होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप आणि संघांकडून उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केलं जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ऐश्वर्या-अभिषेकचं लग्न थांबवण्यासाठी जान्हवी कपूरने कापली होती नस; मोठा खुलासा समोर

पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; IMD कडून महत्वाचा इशारा

“बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस, त्यांनी..”; संजय राऊतांची जहरी टीका

गुडन्यूज! PM आवाज योजनेत आता ‘या’ लोकांनाही मिळेल हक्काचे घर

आनंदवार्ता! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं, काय आहेत सध्या भाव?