बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खेळ महत्त्वाचा नाही! 30 ॲास्ट्रेलियन खेळाडूंचा आयपीएलबद्दल मोठा निर्णय

मुंबई | देशातील कोरोना रूग्णसंख्येमुळे यंदा आयपीएल सामने होणार की नाही, अशी चिंता क्रिकेटविश्वात रंगली होती. पण बीसीसीआयने वेळेपुर्वी सर्व नियोजन करत अखेर भारतातच आयपीएल सामने खेळवत आहेत. भारतातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहून आयपीएल स्थगित करण्याची मागणी केली जात होती. यातच आता 30 ॲास्ट्रेलियन खेळाडूं आयपीएल सोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा स्टीव्ह स्मिथ आणि सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर या स्पर्धेतून माघार घेऊ शकतात. यांच्यासह 30 ॲास्ट्रेलियन खेळाडूं आयपीएल सोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचे केन रिचर्डसन आणि एडम झम्पा त्याचबरोबर राजस्थान राॅयल्सच्या अँड्रयू टाय या तीन खेळाडूंनी आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धा सोडून मायदेशी परतले आहेत.

लवकरच कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाच्या सीमा बंद होण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनेने दिलेल्या वृत्तानुसार इतर खेळाडू, त्याव्यतिरिक्त असणारा स्टाफ, कोच, कॉमेंटेटर असे मिळून एकूण 30 जण ऑस्ट्रेलियात परत जाण्यास इच्छूक आहेत. तर दिल्ली कॅपिटलचा स्टार गोलंदाज आर अश्विनने आयपीएलच्या 14 व्या मोसमातून  मागार घेतली आहे. त्याच्या कुटूंबातील व्यक्तींना कोरोना बाधा झाल्यानं त्यानं हो निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पॅट कमिन्सने 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 30 लाख रुपयांची मदत पीएम केअर फंडाला दान केले होते. कमिन्सने खेळाच्या पलीकडे जाऊन भारतीयांची मनं जिंकली आहेत. त्यासह त्याने इतर खेळाडूंनाही मदतीसाठी आवाहन केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! पोलिसाच्या नावे बनावट अकाऊंट उघडुन ढोंग करत मागितली ‘एवढी’ रक्कम

पेटीएमची मोठी मदत, भारताला ‘इतके’ हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर देणार

Renault Triber कारचं नवं माॅडल भारतात लाँच; जाणून घ्या 7 सिटर गाडीचे नवे फिचर्स

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने कमी व्हायला सुरूवात; बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक

…तर मिळणार नाही गॅस सिलेंडर, जाणून घ्या LPG कंपनीनं आणलेला नवा नियम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More