बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Raj Thackeray: “जो माणूस इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला”

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडव्याला मेळाव्यात राज ठाकरेंनी संबोधित केलं आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. कितीही आमच्यावर लाथा मारल्या तरी आम्ही फरफटत जातो, असं मतदारांना उद्देशून राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज्यातील अनेक मुद्यांवरून त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.

आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. जो जो माणूस इतिहास विसरला आहे त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला आहे. पायाखालची जमीन सटकली आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आमच्याकडे जातीचं हत्यार आहे. माझ्या दृष्टीकोनातून हिंदूत्व आहे ते मी मांडणार आहे. अयोध्येला जाणार की नाही?, जाणार. पण तारीख नाही सांगणार, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

आमच्या महाराष्ट्राचा एक मंत्री दाऊद इब्राहीमशी असलेला मंत्री आहे. सत्तेत अशा प्रकारची माणसं चालणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदाराला पत्र दिलं होतं. कारभार ऐसे करावा की, रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लावणे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या, शिक्षणाचा बत्यागोळ झाला आहे. महाराष्ट्राच्या मराठी माणसांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, असे मुद्दे राज ठाकरेंनी बोलून दाखवले.

दरम्यान, महाराष्ट्रात आणि देशात जातीविभाजन कसं होतं, हे राज ठाकरेंनी सांगितलं आहे. राष्ट्रावादीला जातीविभाजन हवं आहे. शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीयवाद वाढला, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. जातीमधून आम्ही कधी बाहेर पडणार? आम्ही हिंदू कधी होणार?, असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेत.

थोडक्यात बातम्या- 

जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार – राज ठाकरे

Raj Thackeray: “झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका”, राज ठाकरेंची मागणी

Raj Thackeray: “सकाळी पाहतो काय, तर जोडा वेगळाच”; पहाटेच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा टोला

“बाप तो बाप असतो आणि नेता तो नेता, हे कोणी विसरता कामा नये”

Dhananjay Munde: त्यादिवशी विधानसभेत नक्की काय झालं?; अखेर धनंजय मुंडेंनी खुलासा केला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More