बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाताना 18 वर्षीय तरुणी ग्रीलमध्ये अडकली अन्…, पाहा व्हिडीओ

पुणे | पुण्यातील एरंडवणे येथील महिला सेवा मंडळाच्या क्वारंटाईन सेंटरमधून एका 18 वर्षाच्या मुलीने खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. एवढंच नाही तर यादरम्यान ही तरूणी खिडकीत अडकली. ही घटना रविवारी सुमारे साडे अकराच्या दरम्यान घडली असून आपल्या सुटकेच्या मदतीसाठी तरूणीने आरडाओरडा केल्यानंतर ही घटना समोर आली.

सेंट्रल माॅल जवळील महिला सेवा मंडळाच्या क्वारंटाईन सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना जागा कमी असल्याकारणाने मुलगी खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकली. त्यानंतर आपल्या सुटकेच्या मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी तिच्या सुटकेसाठी धाव घेतली. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश न आल्यानं अखेर अग्निशमन दलाला याबद्दल माहिती देण्यात आली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अधिकऱ्यांनी आणि जवनांनी हायड्रॉलिक कटरच्या साह्याने खिडकीचं गज तोडून मुलीची सुटका केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आहे.

दरम्यान, सुटकेनंतर मुलीला सेवा मंडळाच्या व्यवस्थापिकेच्या ताब्यात देण्यात आलं. यावेळी डेक्कन पोलीस देखील तेथे हजर होते.

 

थोडक्यात बातम्या-

“कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर”

‘ही’ थ्री-व्हीलर इलेक्ट्रीक कार 2 रूपयात 5 किमी धावणार!; जाणून घ्या किंमत…

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती!

राज्यातील ‘या’ भागात हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा!

चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत नराधमाने केलं धक्कादायक कृत्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More