बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलगी 3 महिन्यांपासून बेपत्ता, पोलिसांची उडवाउडवीची उत्तरं; बापानं घेतला गळफास!

बीड |  बीड जिल्ह्यातील सिरसाळा या गावात एक हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तीन महिन्यांपूर्वी हरवलेल्या आपल्या मुलीबद्दल पोलिसांत तक्रार देऊन देखील तिचा काहीच ठामपत्ता न लागल्यानं शेख रतन शेख नुरमुहम्मद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जावू लागले आहेत.

रतन शेख यांच्या मुलीला 8 एप्रिल रोजी एका अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. यानंतर शेख यांनी सरसाळा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. तक्रार दिल्यानंतर शेख आणि त्यांचे कुटुंबीय सतत पोलीस स्टेशनला तपास कुठपर्यंत आलाय, हे जाणून घेण्यासाठी फेऱ्या मारत होते. मात्र, दरवेळी पोलिसांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळत होती.

पोलिसांच्या याच गलथान कारभाराला कंटाळून शेवटी रतन शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस प्रशासनच रतन शेख यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप शेख यांच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित पोलिसांवर लवकरात लवकर कारवाई केली जावी, अशी मागणी शेख यांच्या नातेवाईकांची आहे.

रतन शेख यांच्या आत्महत्येनंतर संबंधित पोलिसांवर कारवाई केली जावी यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी सिरसाळा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. जवळपास 6 तास हे आंदोलन चालू होतं. या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे तात्काळ आले आणि त्यांनी नातेवाईकांना संबंधित पोलिसांवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिले. यानंतर नातेवाईकांनी हे आंदोलन मागे घेतले.

थोडक्यात बातम्या – 

‘आधी आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा’; संजय राऊतांचा दानवेंवर पलटवार

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही- आशिष शेलार

…मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?- चित्रा वाघ

शार्लिन चोप्रा आणि राज कुंद्रामध्ये झाला होता ‘हा’ मोठा करार

राज कुंद्राची एडल्ट कंटेटबाबतची ‘ती’ व्हॉट्सअ‍ॅप चाट लीक!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More