बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छोरी धाकड है! खुल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी

नवी दिल्ली | भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. पोलंड येथे सुरु असलेल्या कुस्ती स्पर्धेत विनेशने ही दमदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं आहे. त्याचबरोबर युक्रेनच्या खेळाडूला चितपट करत तिनं विदेशात भारताचा तिरंगा फडकावला आहे.

पोलंड येथे सुरू असलेल्या खुल्या कुस्ती स्पर्धेत भारताची विनेश फोगट आणि युक्रेनची ख्रिस्तियाना बेरेझाला यांच्यात अंतिम सामना रंगला. अंतिम फेरीत भारताच्या विनेश फोगटने  युक्रेनच्या ख्रिस्तियाना बेरेझाला 8-0 अशी धुळ चारली. त्याचबरोबर तिनं भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. हा सामना तिनं एकतर्फी जिंकला. तिनं विरोधी खेळाडूला एकही गुण मिळवू दिला नाही.

विनेशचे या मोसमातील हे तिसरं सुवर्णपदक ठरलं आहे. या मोसमात विनेशने तिसरे सुवर्णपदक पटकावत ऑलिंम्पिकसाठी भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मार्च महिन्यात मॅटेओ पोलिसॉन स्पर्धेत विनेशने सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विनेशने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

दरम्यान, येत्या टोकियो ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताला कुस्ती आणि बॅडमेंटन या दोन खेळाकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा आहेत. मागील ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशादायक राहिली होती. त्यामुळे यंदा खेळाडू चांगली कामगिरी करतील अशीच सर्वांना अपेक्षा आहे,.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसमध्ये आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल”

कौतुकास्पद! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा जगताप दाम्पत्याचा निर्णय

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

आनंदाची बातमी! गेल्या 24 तासात पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

खासदार नुसरत जहाॅं यांचा गरोदरपणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More