बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तरूणीने चेहऱ्यावर लावला एलईडी मास्क अन्…; व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

नवी दिल्ली | कोरोनामुळे सरकारने काही निर्बंध घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क घालणं बंधनकारक आहे. यामुळे वेगवगळे मास्क निघाले आहेत. मास्क घातल्यावर पुढचा व्यक्ती आपल्याकडं पाहून काही बोलतोय की हसतोय हे आपल्याला कळत नाही. या पार्श्वभूमीवर एक फॅशनेबल आणि अनोखा मास्क चर्चेचा विषय ठरतो आहे.

सोशल मीडियावर एलईडी मास्कचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका महिलेने हा एलईडी मास्क घालून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये महिला जेव्हा मास्क घालते तेव्हा लाईट्स एका लाईनमध्ये आहेत. ती जशी-जशी ती बोलू लागते तसे ते लाईट्स देखील हलू लागतात. गंमत म्हणजे या लाईट्स हालताना पाहून तुम्हाला देखील हसू अवरणार नाही.चेहऱ्यावर एलईडी मास्क लावल्यानंतर तिच्या बाजूचे लोक पोट धरुन हसत आहेत.

हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच आपला मास्कला बघण्यासाठी महिला देखील प्रचंड उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आहे. तसेच या व्हिडीओवर प्रचंड कमेंट्स आल्या आहेत.

हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, आयपीएस ऑफिसर दीपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर तो शेअर केला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

लातूरमधील 36 वर्षीय तरूण उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचं कोरोनाने निधन!

‘या’ चित्रपटासाठी आमिर खानने चक्क 12 दिवस केली नव्हती अंघोळ!

कोरोनावर मात करत वसईतील 25 वर्षीय तरुणानं माऊंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा!

ब्रिटनच्या राजघराण्यात राजकुमारीचं आगमन, प्रिन्स हॅरी अन् मेगनला कन्यारत्न

काळ्या बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी अमरावतीत ‘हा’ नवा पॅटर्न

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More