बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नदीच्या प्रवाहात अडकला मुलगा, तरूणीने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

बीड | बीड मधील अंबाजोगाई आणि इतर परिसरात मोठा पाऊस झाल्यानं आद्यकवी मुकुंदराज स्वामी मंदिर तसेच अनेक परिसरात वाहत्या नद्या आणि धबधबे पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमते. अशातच एक दुर्दैवी घटना घडताना एका तरुणीने वेळीच धाडस दाखवलं आणि एका मुलाचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे आता तरुणीच्या धाडसाने लोक देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

बीडमधील मुकुंदराज स्वामी मंदीरात 10 वर्षाचा मुलगा त्याच्या आई-वडिलांंसोबत आला होता. यावेळी तो नदी पात्रात उतरला होता. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं लहान मुलगा तिथेच अडकला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं मदत करण्यासाठी लोक देखील घाबरत होती. मात्र यातच एका तरुणीने धाडस दाखवलं आणि नदीत उतरली.

तरुणीने तिच्या मैत्रिणींच्या ओढण्यांची दोर बनवली आणि एका व्यक्तीला धरायला सांगितली. तयार कलेली ही दोर नंतर तिने मुलाकडे फेकली. त्यानंतर अजून एका व्यक्तीने मदत करत तिघांनी मिळून जोडसाखळी बनवली आणि मुलाला बाहेर काढलं.

दरम्यान, तरुणीने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतूक केलं जात आहे. तसेच या घटनेचा एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर देखील अनेकांनी तरुणीचं कौतूक करत कमेंट्स केल्या आहे. नदी पात्रांमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्यानं सर्वांना स्वतःची तसेच स्वतःच्या मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

…अन् एका क्षणात जमीनदोस्त झाली 3 मजली इमारत, पाहा व्हिडीओ

देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

निष्काळजीपणा जीवावर बेतला, कोरोना टेस्ट करताना किट घशात अडकल्याने महिलेचा मृत्यू

पतीसोबत बहिणीचं अफेअर असल्याचं कळताच पत्नीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

बहुमत चाचणीला तयार राहा’; अमरिंदर सिंग यांचा थेट हायकमांडला इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More