बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ॲानलाईन शिक्षणासाठी मुलीला मोबाईल दिला, एकदा वडिलांनी मोबाईल तपासताच धक्कादायक बाब समोर

पुणे | देशभरात कोरोना महामारीच्या संकटाने सर्वांनाच त्रासून टाकलं आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे संपर्क होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमाचा वापर करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामे केली जात आहेत. मुलांचं शिक्षणही ऑनलाइन पद्धतीने गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. असंच शिक्षण घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील पालकाने आपल्या 11 वर्षांच्या मुलीला नवीन मोबाईल घेऊन दिला पण त्यानंतर भलताच धक्कादायक प्रकार त्यांच्यासमोर आला.

मुलं ऑनलाईन शिक्षण घेत आहे त्यासाठी पालकही त्यांना हव्या त्या गोष्टींचा पुरवठा करण्यात कुठेही कमी पडत नाहीये. मुलांना मोबाईल, इंटरनेट रिचार्ज आणि त्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवण्याचा पूरेपूर प्रयत्न आजकालचे पालक करताना दिसत आहेत. पण मुलांना एवढ्या सोयीसुविधा दिल्यानंतर त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचंही काम पालकांंचं आहे. पिंपरी चिंचवडमधील एका व्यक्तीने आपल्या मुलीला ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी नवीन मोबाईल घेऊन दिला, एकदा सहज तो फोन त्यांनी बघितला तर त्यामध्ये आपल्याच मुलीचा अश्लील व्हिडिओ पाहून त्यांना धक्काच बसला.

हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी मुलीकडे या प्रकरणाची चौकशी केली तर तिने असं सांगितलं, की मला एक ई-मेल आला होता. ज्यामध्ये लिहिलं होतं की जर तू तुझा अश्लील व्हिडिओ पाठवला नाही तर तुझ्या घरच्यांना जीवे मारू, त्यामुळे मी घाबरून त्यांना व्हिडिओ पाठवल्याचं मुलीने आपल्या वडिलांना सांगितलं. त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीला घेऊन पिंपरी चिंचवड सायबर पोलीस विभागात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मुलीने ज्या मेल आयडीवर व्हिडिओ पाठवला तो डिलीट केला असल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर तिचं एका मुलाशी अश्लील संभाषण होत असलेली इन्स्टाग्राम चाट पोलिसांच्या समोर आली. यावर त्या मुलीने ते संभाषण होत असलेलं अकाउंट माझं आहे पण ते मी वापरत नसून माझी एक मैत्रिण वापरते असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांना मुलीवर संशय आल्याने तिची आणखी चौकशी करून आणि ज्या मुलाबरोबर हे संभाषण झालं त्या मुलाची चौकशी केल्यानंतर त्या मुलीने स्वतःचा अश्लील व्हिडीओ केला असल्याचं तपासात स्पष्ट झालं. या घटनेमुळे शाळकरी मुलंही अशाप्रकारे बनाव करून कशी फसवणूक करत आहेत ते दिसून येत आहे त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर काटेकोर लक्ष देण्याची गरज असल्याचं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या

चारचाकीत एकटे असताना मास्क घालावं की नाही?, दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

‘बहिरा स्वतःच्या तालावर नाचे’; संजय निरूपम यांचा राज ठाकरेंना टोला

मास्क नाकावरुन घसरलं म्हणून पोलिसांनी भररस्त्यात तुडवलं, पाहा धक्कादायक व्हिडीओ

कोविशिल्डचा दुसरा डोस घेताना ‘इतक्या’ दिवसांचं अंतर ठेवा, स्वत: पुनावालांनी सांगितलं कारण…

नवरी मंडपात पोहोचली अन् सासूला समजलं ही तर आपलीच बेपत्ता झालेली मुलगी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More