Top News देश

प्रियकरानं गुपचूप लग्न उरकल्यानं प्रेयसी संतापली; रागाच्या भरात केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

बिहार |  सध्या प्रेमात धोका वाढण्याची प्रकरण वाढत चालली आहे. अशातच बिहारमध्ये प्रियकराने प्रेमात विश्वासघात करत दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. मात्र त्यानंतर संतप्त प्रेयसीने जे काही केलं ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

प्रियकर गोपाल राम असं प्रियकराचं नाव आहे. गोपालने दुसऱ्या मुलीश लग्न केलं. त्यामुळे नाराज झालेली प्रेयसी खुपच चिडली होती. प्रेयसी ही गोपालच्या बहिणीची मैत्रिण होती. 1 डिसेंबरला गोपालचं लग्न झालं आणि तो पत्नी आणि इतर नातेवाईकांसोबत मोरा तलाव गावात आपल्या घरी आला.

गोपालाच्या बहिणीची मैत्रिण म्हणून प्रेयसी घरात आली. घरातले सदस्य झोपले असताना तिने थेट नववधूच्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर तिने नववधूचे केस कापले आणि तिच्या डोळ्यात त फेविक्वीक ओतलं. नववधूने आरडाओरडा केला तिला वेदना सहन न झाल्याने ती तडफडू लागली. आरडाओरडा केल्याने प्रेयसी पळ काढण्याच प्रयत्नात असताना घरातल्यांनी तिला पकडलं आणि घरात बांधून ठेवून मारहाण केली.

दरम्यान,  यामध्ये नववधू गंभीर जखमी झाली असून तिची नजर जाण्याची शक्यता आहे. बिहारच्या शरीफ येथील सदर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा अभाव आहे; शरद पवारांचे स्पष्ट मत

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

“शेठजी लायटिंग छान होती आणि तुमचा डान्स तर लाजवाबच”

अमरीश पटेल यांचा विजय सत्ताधाऱ्यांसाठी मोठा राजकीय धक्का- गिरीश महाजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या