महाराष्ट्र मुंबई

युवा पत्रकाराचा नवा आदर्श; ‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांनीही थोपटली पाठ!

मुंबई | ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करत मुख्यमंत्री सहायता निधीत 11 हजार 111 रुपयांची मदत जमा केली आहे. वैभव परब यांनी मदतीचा हा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलाय.

माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी आज राज्यभरात वृत्तसंकलनाचे काम करत आहेत.  लोकांपर्यंत माहिती पोहोचवत आहेत. हे ही एक प्रकारे कोरोना विषाणूविरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. आज वैभव परब यांनी कोरोनाविरुद्ध लढतांना मदतीत माध्यम क्षेत्र ही मागे नाही हे दाखवून दिले असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईशाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतांना तिला आरोग्यसंपन्‍न दीर्घायु लाभो ही सदिच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूविरुद्ध लढताना राज्यातील व्यापारी, उद्योजक, कॉर्पोरेटर्स, स्वंयसेवी संस्था यांच्याप्रमाणेच अनेक बालयोद्धेही मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीची रक्कम जमा करत आहेत. आज साईशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मदत करणाऱ्या बालयोद्ध्यातआणखी एकाची भर पडली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यातील ‘हा’ भाग नवा कंटेन्मेंट परिसर घोषित; एकाच दिवशी सापडले 19 कोरोनाबाधित रुग्ण

आम्हाला डोमकावळे म्हणताय, जनता तुम्हाला लबाड लांडगे म्हणते; शेलारांची टीका

महत्वाच्या बातम्या-

…’या’ गोष्टीमुळं शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराज

कोरोनाशी लढा देण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरतंय का?, आजची आकडेवारी धक्कादायक

‘…तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील’; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या