पोलिसांत तक्रार केल्यामुळे मुलीच्या वडिलांना घातल्या गोळ्या; हाथरसमधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
हाथरस । उत्तर प्रदेश नेहमीच खून, बलात्कार, मारामाऱ्या या घटनांमुळे राहत असतं. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणामुळे संपुर्ण भारत हळहळला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले गेले. आता त्यात हाथरसमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे.
हाथरस जिल्ह्यातील सासनी क्षेत्रामध्ये असणाऱ्या नौजरपूरमध्ये ही घटना घडली आहे. एका पित्याने मुलीची छेडछाड केली म्हणून पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार केली म्हणून 4 लोकांनी मुलीच्या वडिलांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव अमरिश असं आहे.
1 मार्च रोजी मुलीच्या वडिलांवर चार लोकांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. परंतू रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मुलीचे वडील शेतात बटाटे काढत होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांची मुलगी दवाखान्यात पोहोचली तेव्हा आपल्या वडीलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तीला मोठा धक्का बसला.
दरम्यान, पोलिसांनकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पिडीत मुलीने पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा केली आहे. संबंधित मुलीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बापाच्या मृत्युनंतर मुलीने हंबरडा फोडला. डीएसपी रुची गुप्ता या प्रकरणात कारवाई करत आहेत.
पाहा व्हिडीओ-
आदित्यनाथ ने यूपी को जंगलराज में बदल दिया है। बेटी के साथ छेड़खानी की शिकायत करने पर पिता को खुलेआम गोली मार दी गई।
अपराधियों को सरकार का पूरा संरक्षण मिला है। शोहदों के भीतर प्रशासन का कोई डर नहीं रह गया है।
बधाई हो, रामराज्य बनाने वाले जंगलराज बनाने में सफल हो गए हैं। pic.twitter.com/Bzsnqzn4zJ
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) March 2, 2021
थोडक्यात बातम्या-
“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंचाही राजीनामा घ्या”
ते सगळ्यात मोठे गुंड; भर भाषणात हर्षवर्धन जाधवांच्या मैत्रिणीनं केलेल्या आरोपांनी खळबळ
धक्कादायक! भाजपच्या ‘या’ खासदाराचं कोरोनामुळे निधन
कार्तिक आर्यन समोर येताच तिने केलं असं काही की…; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
Comments are closed.