बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लटकत होतं मुलीचं डोकं अन्…; हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नये!

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावरील एका व्हिडीओने सर्वांच्या अंगावर काटा आणला आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलीचं डोक सिलींगमधून लटकताना दिसत आहे. हे दृश्य पाहून तेथील लोकं देखील काहीशे घाबरले होते. मात्र याचा तपास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना चीनच्या साऊथ वेस्ट भागातील आहे.

घरातील लोकांनी जेव्हा लटकतं डोकं पाहिलं तेव्हा ते देखील घाबरले होते. घरातील सदस्यांनी सिलींग फॅन लवण्यासाठी होल पाडलं होतं. या होलातूनच तिचे डोक्याचे केस लटकताना दिसत होते. लोकांनी वर जाऊन पाहिल्यानंतर घरातील मुलीचंच डोकं या होलात अडकलं असल्याचं दिसून आलं. सगळ्यांनी प्रचंड प्रयत्न केले मात्र, मुलीचं डोकं बाहेर काढण्यास यश आलं नाही.

सर्वांनी अथक प्रयत्न करुन देखील मुलीचं डोकं बाहेर न आल्यानंतर लोकांनी फायर फायटर्सच्या टीमला बोलावून घेतलं. त्यानंतर अनेक प्रकारे, उपकरणांचा वापर करुन मुलीचं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर फायर टीमच्या जवानांनी खाद्यतेल वापरुन जागा घसरट केली आणि नंतर मुलीचं डोकं बाहेर काढलं. मुलगी सुखरुप बाहेर आली असून तिला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही आहे.

दरम्यान, सिलींग फॅन जोडण्यासाठी घरात हे होल पाडण्यात आलं होतं. तसेच मुलगी देखील उत्सुकतेने त्या होलातून डोकवायला गेली. याचवेळी ती तिथं अडकून बसली. अशा गोष्टी कधीतरी भयानक ठरु शकतात. त्यामुळे लहान मुलं घरात असताना पालकांनी सावधगिरी बाळगावी.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

‘स्वत:च्या राजकारणासाठी…’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा विरोधकांना सल्ला

अफगाणिस्तानात नवं सरकार स्थापनेच्या हालचाली; राष्ट्रपती पदासाठी ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर

संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ! ‘इतक्या’ शस्त्रधारी जवानांचं राऊतांना संरक्षण

शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय; जवळच्या मैत्रिणीने केला ‘हा’ खुलासा

जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला लवकरच भारतीय बाजारात; ‘या’ चार इलेक्ट्रिक गाड्यांना मंजुरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More