बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारतीयांचा गौरव होतो”

नागपूर | राज्यपाल भगत सिंग कोश्यारी(Bhagat singh Koshyari) हे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी तेे त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. राजस्थानी आणि गुजराती माणसे मुंबईतून गेले तर मुंबईत काय उरेल ?, असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केल्याने महाराष्ट्राच्या राजकरणात खळबळ उडाली होती. सामान्य मराठी माणसांनीही राज्यपालांवर सडकून टीका केली होती. त्यातच आता राज्यपालांच्या  वक्तव्याने पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडाली आहे.

विदेशात भारतीयांचा सन्मान वाढला आहे, असा दावा भगत सिंग कोश्यारी यांनी केला आहे. हे सगळं नरेंद्र मोदींमुळे(PM Narendra Modi) शक्य झाले आहे, असं त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हणले आहे. मोदी वीस वीस तास काम करतात. आपल्याला असं नेतृत्व मिळाल आहे की, परदेशातही लोक भारतीयांचा सन्मान करत आहेत, असंही कोश्यारी म्हणाले.

मोदींनी स्वाभिमान जागवल्याने परदेशात भारतीयांचा गौरव केला जात आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते, असं वक्तव्य कोश्यारी यांनी गुरूवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केेले.

तसेच त्यांनी या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांचेही कौतुक केले. ते म्हणाले देशात गडकरी हे त्यांच्या कामामुळे ओळखले जातात. यावेळी त्यांनी मराठी भाषेवरील आपल्या प्रेमाचा पुनरूच्चार केला. त्यामुळे राजकारणात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका!

दीपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

‘मामी म्हणलेलं मला आवडतं, फार मजा येते’ -अमृता फडणवीस

मोठी बातमी! सामनाच्या संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी काॅंग्रेसला आणखी एक धक्का; अजित पवारांना राजीनामा द्यावा लागणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More