बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेळीनं 8 पायांच्या पिल्लाला दिला जन्म मात्र अवघ्या पाच मिनिटानंतर…

नवी दिल्ली | सध्या सोशल माध्यमांवर प्राण्यांचे काही व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. यामध्ये प्राणी काही चित्र-विचित्र हालचाल करताना आपण पाहिलं आहे. तर काहीवेळा हिंस्र प्राण्याला माकडासारखा छोटा प्राणी त्रास देत असतो. अशातच एका शेळीने आठ पाय आणि दोन कूल्हे असलेल्या पिल्लाला जन्म दिला आहे. या शेळीचे फोटोे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

पश्चिम बंगालच्या कालमेघा परिसरातील बनगाव येथील आहे. सरस्वती मोंडल यांनी घरी गायी आणि शेळींचं पालन केलं आहे. शेळीनं आठ पायाच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावात वाऱ्याच्या वेगात पसरली होती. यानंतर गावातील अनेकांनी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी मोंडल यांच्या घरी गर्दी केली होती.

16 जुलैला मोंडल यांच्या घरी शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला. यामधील एक पिल्लू सामान्य होतं तर दुसरं पिल्लू आठ पायांचं होतं. आठ पाय आणि दोन कूल्हे असणाऱ्या या शेळीच्या पिल्लाला पाहून मोंडलही घाबरुन गेल्या होत्या. मात्र आठ पायांच्या पिल्लाचा अवघ्या पाच मिनिटातच मृत्यु झाला.

दरम्यान, आठ पायांचं शेळीचं पिल्लू मी पहिल्यांदाच पाहत आहे मलाही आश्चर्य वाटत आहे. मात्र त्या आठ पायच्या पिल्लाचा पाच मिनिटात मृत्यु झाला असून दुसरं पिल्लू आणि शेळी सुखरूप असल्याचं सरस्वती मोंडल यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

इन्कम टॅक्सच्या तपासात धक्कादायक खुलासा, 256 पानटपरी, ठेलेवाले निघाले करोडपती!

राज कुंद्रासोबत आता अजिंक्य रहाणे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, पाहा काय आहे प्रकरण

‘या’ देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर घातली बंदी

पोर्नोग्राफी प्रकरणी नवऱ्याला अटक झाल्यावर शिल्पाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“सरकार चालवता येत नाही म्हणून सर ‘कार’ चालवतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More