बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशकात पावसाचं थैमान! गंगापूर धरण ओव्हरफ्लो तर, गोदावरी नदीला पूर

नाशिक | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात दोन ते तीन दिवसात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील धरणं ही पूर्ण क्षमतेने भरत आहेत. गेल्या काही महिन्यापासून नाशिकरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. अशातच आता नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण शहराला पाणी पुरवठा करणारा मुख्य धरण आता पूर्णक्षमतेने भरलं आहे.

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरणाचा जलसाठा 98 टक्क्यांनी भरलेला आहे. त्याचबरोबर नाशिकमधील दारणा धरण तसेच नांदूर मधमेश्वर प्रकल्पासह, मुकणे, भाम, भावली, आळंदी अशी छोटीमोठी धरणे देखील 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे आता नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जोरदार पावसाने गंगापूर धरणाचा जलसाठा वाढत असलेल्यानं जलसंपदा विभागाने कालपासून धरणातून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नाशिकमधील रामकुंडसह अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर जास्त असल्यानं या वर्षीं नाशिकमधील गोदावरी नदीला या वर्षीचा पहिला पूर आला आहे. त्यामुळे गोदाघाट परिसरातील, रामकुंड येथील दुकाने हलविण्यात आली आहेत.  नागरिकांना नदीकाठी येऊ न देण्याच्या सुचना देखील पोलिसांनी दिल्या आहेत.

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात मुसळधार पाऊस होत आहे.  त्यामुळे हवामान विभागाने दोन दिवस या शहराला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहरातील अनेक धरणे पुर्ण क्षमतेने भरत चालली आहेत. त्यामुळे नाशिककरांना आता पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

थोडक्यात बातम्या-

काय सांगता! हाताला काम नसल्यानं तरूणांनी सुरू केला चक्क नोटांचा छापखाना

मोठी बातमी! याॅकर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

बाप्पासोबत लाखो रुपयांच्या मुकूटाचंही पाण्यात विसर्जन, लक्षात आल्यानंतर….

…तर मी राजीनामा द्यायला तयार आहे – विजय वडेट्टीवार

‘…म्हणून मला भारतात मुलाला जन्म देण्याची इच्छा नाही’; ‘या’ अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More