बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकार चालवता येत नाही म्हणून सर ‘कार’ चालवतात”

मुंबई | आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापुजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. या महापुजेसाठी उद्धव ठाकरे यांनी कार स्वत: आठ तास ड्राईव्हिंग करत पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. यावरून राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर अनेक टीकांचा वर्षाव केला असल्याचं पाहायला मिळतं आहे.

अशातच भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. या संदर्भात अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये सरकार चालवता येत नाही म्हणून सर ‘कार’ चालवतात, असं लिहिलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

तसेच शनिवारी 17 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये दुर्घटना घडली. त्यावेळी उद्धव ठाकरे त्या ठिकाणी आले नाहीत. याचाही संदर्भ जोडत भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. शनिवारी ड्रायव्हिंग करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चेंबूर येथे आले असते, तर त्यांच्यासमोर लोटांगण घातलं असतं, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे’, असं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बॅनरवर फोटो लावला नाही म्हणून शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा!

‘सांगलीचे पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा’; निलेश राणेंचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

देशभरात वाऱ्याच्या वेगानं पसतोय ट्रेंड, दिसले मोदी की पड पाया!

“महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही”

“हिच्यासोबत जाणार नाय खूप मारते हो”, तरुणाच्या तक्रारीनंतर तरुणीचा पोलीस स्टेशनमधेच राडा

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More