होय आम्ही अपयशी ठरलो!; भर सभागृहात शिवसेनेच्या मंत्र्याची कबुली
मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नाही. त्यातच आता शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत बोलताना महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अपयशी ठरल्याचं कबुल केलं आहे.
मी कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचं आवाहन केलं होतं. आधी मी माझ्यासमोरील मागण्या मान्य केल्या होत्या. दिवाळीच्या तोंडावर लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी न्यायालयात गेलो होतो. राज्यात दोन वर्षे कोरोनामुळे बोनस दिला नव्हता. मात्र, यंदा मी बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. हे सर्व सुरू असताना न्यायालयाच्या आदेशानंतर एक एक डेपो बंद होत गेला, असं अनिल परबांनी सांगितलं आहे.
एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिले. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा आम्ही अभ्यास करत होतो. एसटी कर्मचाऱ्यांना पगार शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराजवळ नेऊन ठेवला. राज्य सरकारने वेळेवर पगार देण्याची जबाबदारी स्वीकारली होती. कोणाला नोकरीवरून काढण्याचा प्रश्नच नव्हता, असं अनिल परबांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आम्ही पगारामध्ये थेट 5 हजार रूपयांची वाढ केली. इतिहासात कधीही एवढी पगारवाढ झाली नव्हती. दुर्देवाने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. एसटी कर्मचाऱ्यांनी नवा नेता निवडून संप सुरू ठेवला. शासनाला हा संप मिटवण्यात अपयश आलं, असं अनिल परब यांनी मान्य केलं.
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, आम्ही थांबणार नाही”
मोठी बातमी! शिवसेनेचा आणखी एक बडा नेता ईडीच्या रडारवर, कोट्यवधींची मालमत्ता जप्त
मोठी बातमी! पुतिन यांचा रशियन सैन्याला मोठा आदेश
…म्हणून महाविकास आघाडीच्या आमदाराला भर विधानसभेत रडू कोसळलं!
“यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?”
Comments are closed.