बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रीलंका दौरा संपवून भारतात परतणाऱ्या ‘या’ 3 भारतीय क्रिकेटपटूंना सरकारने परवानगी नाकारली

नवी दिल्ली | नुकताच भारतीय संघ श्रीलंकेतील दौरा संपवून भारतात परत आला आहे. दरम्यान, टी-ट्वेंटी मालिका भारतीय संघाने जिंकली असेल तरीही वन डे मालिकेत भारतीय संघाला यश मिळवता आलं नाही. श्रीलंकेसोबतचा सामना भारताला जिंकता आलेला नाही.
श्रीलंका दौरा संपवून भारतात परतणाऱ्या तीन भारतीय क्रिकेटपटूंना सरकारने परवानगी नाकारली आहे. टी-ट्वेंटी सामन्यापूर्वीच भारतीय संघातील कृणाल पांड्या याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच कृणालच्या संपर्कात आलेल्या 7 भारतीय क्रिकेटपटूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं.

भारतीय संघातील एकूण 8 खेळाडू श्रीलंका दौऱ्यातून बाहेर पडले होते. तसेच कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले कृष्णप्पा गौतम आणि यजुवेंद्र चहल यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना देखील विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

श्रीलंका सरकारने भारतीय खेळाडूंना विलगीकरणात ठेवल्यामुळे यजुवेंद्र चहल, कृष्णप्पा गौतम आणि कृणाल पांड्या यांना भारतात परतण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. ते आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर जर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरच ते भारतात परतू शकणार आहेत. अन्यथा त्यांना परत श्रीलंकेमध्येच क्वारंटाईन व्हावं लागेल.

थोडक्यात बातम्या

मुंबईची कोरोना रूग्णसंख्या आली आटोेक्यात; पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

राष्ट्रवादीचा माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदलविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

15 टक्के फी कपातीविरोधात खासगी शाळा आक्रमक; सरकारला दिला ‘हा’ इशारा

ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले

“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More