बदलापूर अत्याचार प्रकरणी सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!

Badlapur | बदलापूर पूर्वेला असलेल्या एका नामांकित शाळेतील एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या अशा दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार (Badlapur) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारने घेतला मोठा निर्णय

बदलापूर (Badlapur) येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.

दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा दिले आहेत, असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

अत्याचाराच्या घटनेच्या तपासाला वेग

पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या तपासाला आता वेग आला आहे.

बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ नागरिक रेल्वे रुळावर उतरले आहेत. यामुळे गेल्या दोन तासांपासून कल्याण कर्जत मार्गावर लोकलसेवा ठप्प झालीये.

बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिकांनी रेलरोको आंदोलन केलंय. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रुळावरून बाजूला होण्यास नकार दिला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

पुढील काही तास धोक्याचे! ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट जारी

बदलापूर स्टेशनवर आंदोलक आक्रमक; पोलिसांवर दगडफेक

… तर नराधमांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, सुप्रिया सुळे संतापल्या

“तुमच्या दीड हजारांनी काही होणार नाही, आम्हाला न्याय द्या”; बदलापूर अत्याचार प्रकरणी महिलेचा संताप

“बॉयफ्रेंडसोबत फिरायला..”; कोलकाता प्रकरणावर ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य