बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांच्या लसीकरणबाबत सरकारने उचललं मोठं पाऊल!

मुंबई | अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांच्या लसीकरणबाबत सरकारने उचललं मोठं पाऊल आहे. अंथरुणाला खिळून असणारे रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचं लसीकरण केलं जाईल, असं सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.

नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण आणि सदरची व्यक्ती, रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचं डॉक्टरांचं वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी माहिती [email protected] या ईमेलवर पाठवण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.

अंथरूणाला खिळून असलेली व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचा दाखला तसेच या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तींने लसीकरणासाठीचे संमतीपत्र माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाने कळवले आहे.

जी व्यक्ती अंथरुणाला खिळून आहे व पुढील सहा महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ही विशेष सुविधा आहे.

थोडक्यात बातम्या- 

पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा ‘या’ तारखेपर्यंत बंदच राहणार!

पवार-मोदी भेटीनंतर संजय राऊतांचा भाजपला इशारा, म्हणाले…

‘पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर…’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याची खुली ऑफर

“शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करु, म्हणणाऱ्या अण्णांची फडणवीसांच्या भेटीनंतर भूमिका बदलली”

अनिल देशमुखांच्या मालमत्ता जप्तीनंतर काँग्रेसचे थेट ‘ईडी’ला प्रश्न

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More