Top News देश

सरकार शोधतंय स्वयंसेवक करावी लागणार ‘ही’ कामं

नवी दिल्ली | बाल पोर्नोग्राफी, बलात्कार, दहशतवाद, बेकायदेशीर मजकूर तसेच राष्ट्रविरोधी काम करणाऱ्यांची माहिती सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नागरिक सहभागी होऊ शकतात. सरकारने याबाबत एक उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती आहे.

या उपक्रमार्तंगत गृह मंत्रालयाचं सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर नोडल पॅाईंट म्हणून कार्य करणार आहे. यासाठी सायबर स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी नागरिक स्वत:च्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपल्या नावाची नोंदणी करु शकतात.

स्वयंसेवकांना या उपक्रमात नोंदणी करण्यासाठी स्वत:चं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसह वैयक्तिक माहिती देणं आवश्यक आहे. गृह मंत्रालयाच्या पोर्टलवर सायबर क्राईम स्वयंसेवक म्हणून नोंदणी करताना या उपक्रमाचा उपयोग कोणीही व्यावसायिक फायद्यासाठी किंवा आपल्या संघटनेविषयी सार्वजनिक वक्तव्य जारी करण्यासाठी करु शकत नाही असं नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, स्वयंसेवकाला कोणत्याही व्यासपीठावर गृह मंत्रालयासोबत काम करत असल्याचा दावा करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा उपक्रम सुरूवातील जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरा येथे प्रायोगिक तत्त्वावर चालवला जाणार असून त्यानंतर याची पुढील दिशा ठरवली जाणार आह.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! शिंक आली म्हणून सरकारी कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

अमेरिकेतील जोडप्यानं चक्क धोतर आणि साडी नेसून केलं स्कीइंग; पाहा व्हिडीओ

सेलिब्रिटींवर ट्विट करण्यासाठी मोदी सरकारचा दबाव?; गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात- प्रकाश आंबेडकर

सचिनच्या घराबाहेर बॅनरबाजी करणाऱ्या ‘स्वाभिमानी’ मुलाचं नेमकं म्हणणं काय? पाहा व्हिडीओ-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या