बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची लस घेतल्यानंतर ‘ही’ लक्षणं दिसणं धोक्याचे संकेत, सरकारनंच केलंय सावध!

नवी दिल्ली | देशभरात लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. त्यातच लसींसंदर्भात अनेक संभ्रम नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यातच ब्रिटनच्या एस्ट्राजेनेका ऑक्सफर्ड या लसीमुळे अनेकांना साईड इफेक्ट होत असल्याचं दिसून आलं. रक्त गोठून गोळे बनत असल्याचं समोर आलं. त्यानंतर, आता भारतात सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीवरही त्याचा परिणाम होत असताना दिसून येत आहे.

Photo Courtesy – Pixabay

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आरोग्य कर्मचारी व लस घेतलेल्या लोकांना लस घेतल्यापासून 20 दिवसांच्या दरम्यान, ब्लड क्लाॅटची लक्षणं आढळून आली तर तात्काळ लसीकरण केंद्रावर संपर्क करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Photo Courtesy- Pixabay

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या सूचनांनुसार लस घेतल्यानंतर विशेषतः कोविशिल्ड ही लस घेतल्यानंतर जास्त डोके दुखणे, छातीत दुखणे, शरीरावर सूज येणे तसेच उलटी आणि पोटामध्ये कळ येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असतील तर वेळ न दवडता तात्काळ लसीकरण केंद्रावर संपर्क करावा.

Photo Courtesy- Pixabay

याशिवाय जर लस घेतल्यानंतर शरीराच्या कोणत्याही भागावर लालसर रंगाचे डाग दिसतील तर अशा लोकांनी लसीकरण केंद्रावर अजिबात वेळ न घालवता पोहोचणे गरजेचे आहे.

Photo Courtesy- Pixabay

लसीकरण झाल्यानंतर अंगदुखी तसेच कंटाळा येणे आणि सारखा मूडमध्ये बदल होणे, उलटी होणे आणि कमी दिसणे अशी लक्षणे गंभीर असून अशी लक्षणे असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

Photo Courtesy- Pixabay

लसींच्या साईड इफेक्टवर अभ्यास करणाऱ्या राष्ट्रीय समितीने सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये ब्लड क्लाॅटचं प्रमाण अत्यंत कमी असून कोविशिल्ड ही लस घेतलेल्या लोकांनाच याच्या दुष्परिणामाचा सामना करावा लागू शकतो. भारतात 0.61 टक्के लोकांनाच लसीचे दुष्परिणाम दिसून येत असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

Photo Courtesy – Pixabay

ब्रिटनच्या तुलनेमध्ये भारतामध्ये लसींचे दुष्परिणाम कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत. इतर देशांमध्ये लस घेतल्यानंतर ब्लड क्लाॅटचं प्रमाण लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

Photo Courtesy- Pixabay

पुरुष व महिलांमध्ये लसींचे दुष्परिणाम सारख्याच प्रमाणात पाहायला मिळत आहेत. तसेच लस घेतल्यानंतर 28 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्यासंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. भारत बायोटेकने बनवलेल्या लसीचा आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम भारतामध्ये दिसून आलेला नाही.

Photo Courtesy- Pexels

31 मार्च रोजी झालेल्या बैठकीमध्ये AEFI समितीने दिलेल्या अहवालानुसार, लसीकरणासंदर्भात गंभीर दुष्परिणाम आणि मृत्यू झाल्याच्या एकूण 617 घटना समोर आल्या होत्या. 29 मार्च पर्यंत देशात लसीकरण पूर्ण केलेल्या 180 लोकांचा मृत्यू झाला होता.

Photo Courtesy- Pixabay

कोविशिल्ड या लसीमध्ये चिंपांजीला संक्रमित करणारा विषाणू संशोधन करण्यात आला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरू शकत नाही. तसेच त्या संशोधन केलेल्या व्हायरसमध्ये एक भाग कोरोना व्हायरसही आहे, ज्याला स्पाईक प्रोटीन असे देखील म्हणतात.

Photo Courtesy- Pixabay

कोविशिल्ड ही लस शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवते आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम तोच स्पाईक प्रोटीन करतो. अँटीबॉडीज आणि मेमरी सेल्स बनवण्याचं काम या लसीद्वारे केलं जातं.

Photo Courtesy- Pixabay

कोविशिल्ड या लसीचा परिणाम होण्याची टक्केवारी ही 70 टक्के आहे, तर दुसरा डोस पूर्ण केल्यानंतर ती 90 टक्‍क्‍यांपर्यंत ही वाढू शकते असा दावा करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या –

नागपूरात एका अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्याच आजीचा चिरला गळा अन्…

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्षांचं कोरोनानं निधन, लसीचे दोन्ही डोस घेतलेले!

‘केम छो वरळी विचारणारा आमदार कुठे आहे?’; निलेश राणे यांचा वरळीकरांना सवाल

देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

कोरोना रुग्णांवर ‘म्युझिक थेरपी’, झिंगाट गाण्यावर कोरोना रूग्ण थिरकले ; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More