बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची भीती दाखवून सरकार दहशत माजवतंय- बंडातात्या कराडकर

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा आटोक्यात येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत असताना वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांनी सरकार विरोधात बंड पुकारलं असून अनेक गंभीर आरोपही केले.

श्री क्षेत्र देहू येथील तुकाराम महाराजांचा बीजोत्सव सोहळा आणि पैठणची यात्रा कोरोनाच्या कारणामुळे रद्द करून सरकार जनतेची आणि वारकऱ्यांची फसवणूक करत असल्याचं बंडातात्या कराडकर यांनी सांगितलं. त्याचबरोबर कोरोनाला पुढे करून सरकार राज्यात दहशत माजवत आहे. अशा प्रकारचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायातील लोकांना तुकाराम बीज आणि पैठणच्या यात्रेला जमण्याचं आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केलं. तसेच साध्या सर्दी-पडसं झालेल्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत असून कोरोनाच्या नावाखाली जनतेला फक्त फसवलं जातंय आणि खोटे अहवाल दिले जात असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.

महाराष्ट्र सरकारने कोरोनाला जास्त प्रमाणात महत्त्व देऊन जनतेमध्ये दहशत पसरवली. कोरोना वाढत नसून तसं फक्त भासवलं जात आहे. असा आरोपही बंडातात्या कराडकर यांनी केला. केवळ वारकरी सांप्रदायाचे उत्सव यात्रा गेल्या वर्षभरात होऊ दिले नाहीत, त्यामुळे आता पैठणला उत्सवाच्या दिवशी शुकशुकाट असणं आमच्या बुद्धीला पटत नाही. सरकारचे नियम तोडून आम्ही वारकरी मोठ्या प्रमाणात या सोहळ्यासाठी एकत्र येणार आहोत. त्यासाठी आमच्यावर जे काही गुन्हे दाखल करायचे ते करा,  आम्ही त्याची शिक्षा भोगायला तयार असल्याचं बंडा तात्यांनी या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“अनिल देशमुख यांच्याआधी उद्धव ठाकरेंचा राजीनामा घ्या, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”

“महाराष्ट्रात गृहविभाग नेमकं कोण चालवतंय; अनिल परब की अनिल देशमुख?”

“ठाकरे सरकार चोरांचं, खुन्यांचं असून ते बरखास्त करण्यात यावं”

“वाझेला कामावर रुजू करून घेताना सरकार काय झोपलं होतं का?”

“…त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा दिला होता का?”

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More