बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा…- नितेश राणे

मुंबई | महाराष्ट्रातील अनेक भागात दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्रिपूरामध्ये जमावाने मशिद पेटवल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही दिसून आले होते. रजा अकादमीनेही आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे भाजप नेते नितेश राणे यांनी रजा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

त्रिपुरामधील अफवेनंतर महाराष्ट्रातील अमरावती,नांदेड, भिवंडी या भागात मुस्लिम जमावाकडून मोर्चे काढण्यात आले होते. काही जणांनी दुकानेही फोडल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. एकूणच दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती. यामागे रजा अकादमीचे तरूण असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.

यामुळे नितेश राणे यांनी संतप्त भूमिका घेत रजा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक भागात जी हिंसक दंगल उसळली. त्यामागे अतिरेकी संघटना रजा अकादमीच आहे. प्रत्येक वेळेस ते शातंता भंग करतात, सर्व नियम पायदळी तुडवतात. आणि सरकार नुसत पाहत राहतं, असा घणाघात त्यांनी केला आहे.

सरकारने त्यांच्यावर बंदी घालावी, अन्यथा महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही त्यांना संपवू, असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे. त्यांनी ट्वीट करून हा इशारा दिला आहे. दरम्यान रजा अकादमीची स्थापना 1978 साली करण्यात आली होती. रजा अकादमी मुख्यत: मुस्लिम समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलन करते आणि मुस्लिम विचारवंताच्या पुस्तक प्रकाशनाचे काम करते.

 

थोडक्यात बातम्या-

“नोटबंदीमुळे आपण कॅशलेस होण्याऐवजी लेसकॅश झालो”

“एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात”

‘लगता है मोहतरमा…’; नवाब मलिकांचं कंगणावर टीकास्त्र

भाजपच्या माजी मंत्र्यावर नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप!

“लाज लज्जा असेल तर कंगणाने देशाची माफी मागावी”

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More