बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप यामुळे सरकारने मला क्लीन चीट द्यावी”

मुंबई |  विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कालपासून अधिवेशनादरम्यान अनेक वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतल्यानं अधिवेशनात मोठा गदारोळ उडालेला देखील पाहायला मिळाला आहे. अशातच आज विधानसभेच्या सभागृहातच सत्ताधारी पक्षातील आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल दाद मागितली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे प्रताप सरनाईक अडचणीत सापडले आहेत. याविषयी दाद मागताना प्रताप सरनाईक अधिवेशनादरम्यान म्हणाले की, मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे आणि माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप आहेत. यामुळे सरकारने मला क्लीन चीट द्यावी.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला आहे. भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यानं 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे. भाजपच्या या 12 निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन निलंबनाच्या कारवाई विरोधात दाद मागितली आहे.

थोडक्यात बातम्या –

“खोटं कसं बोलावं हे महाविकास आघाडी सरकारकडून शिकलं पाहिजे”

‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरील शिल्पा शेट्टीच्या नृत्याने चोरलं चाहत्यांचं मन

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर आलं आर्थिक संकट, उपचारालाही नाहीत पैसे

मुहुर्त ठरला! ‘या’ दिवशी राहुल वैद्य आणि गर्लफ्रेंण्ड दिशा अडकणार विवाहबंधनात

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More