Top News कोरोना पुणे महाराष्ट्र

“सर्व खासगी रुग्णालये यापुढे सरकारनेच चालवावी”

पुणे | सध्या कोरोना विषाणूचा फैलाव सर्वत्र झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशात कोविड रुग्णालयांसाठी सरकारने सक्तीने लादलेल्या आणि न परवडणाऱ्या दरात, लघु आणि मध्यम आकाराची खासगी रुग्णालये चालवताना यापुढे दैनंदिन खर्च भागवणे दिवसेंदिवस अशक्य होत चालले आहे. आज इंडियन मेडिकल असोसिएशनाच्या सदस्यांपैकी सर्व हॉस्पिटल मालक त्यांच्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनच्या प्रती आयएमए शाखा कार्यालयात जमा करणार आहेत.

सरकारने सक्ती केलेल्या दरासह रुग्णालये चालवणे त्यांना परवडणारे नाही आणि ही रुग्णालये सरकारनेच चालवावी, असं अवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनव्दारे शासनाला केलं जाणार आहे. तसेच 15 सप्टेंबर म्हणजेच आज  इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व हॉस्पिटल मालक त्यांच्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनच्या प्रती आयएमए शाखा कार्यालयात जमा करणार आहेत.

आयएमएने 12 सप्टेंबर रोजी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि दंतवैद्यकीय अशा सर्व पॅथींच्या २४ विविध वैद्यकीय संस्थांची बैठक बोलावली होती. सर्व संघटनांनी आयएमएच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून एकत्र काम करण्यासाठी संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सात दिवसांत सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर बेमुदत काम बंद करतील, यावर या बैठकीत एकमत झालंय.

महत्वाच्या बातम्या-

काळ कठीण आहे फोन बंद ठेवू नका, 3 वाजताही कुणी फोन केला तरी उचला- चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथं तसं काही होईल वाटत नाही- निलेश राणे

…नाहीतर माझी जवानी अशीच निघुन जाईल; कोरोनाग्रस्त ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

पुणे जिल्ह्यातील सर्व संशयितांबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला मोठा निर्णय

रामदास आठवले हे अर्धशटर बंद झालेलं दुकान आहे- अनिल परब

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या