बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; सरकार मांडणार ‘हे’ 3 मुख्य प्रस्ताव

मुंबई | विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन फक्त दोनच दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. 5 आणि 6 जुलै रोजी हे अधिवेशन मुंबईत पार पडणार आहे. विरोधीपक्षाने थेट आक्रमक भूमिका घेतल्यानं आता हे अधिवेशन मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणे अधिक गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार मुख्य 3 प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  1. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलनामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. शेतकरी केंद्राने केलेला कायदा रद्द करण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव सादर केला जाण्याची शक्यता आहे.
  2. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभर पेटताना दिसतोय. मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे आंदोलनाचा भडका उडताना दिसतोय. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी एक ठराव मांडला जाणार आहे. केंद्र सरकारच्या हातात आरक्षणाचा चेंडू गेल्यानं भाजप या विषयावर कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
  3. ओबीसी आरक्षणासाठी गरजेचा असलेला इम्पेरिकल डाटा केंद्र सरकारने द्यावा अशी मागणी ठाकरे सरकार करत आहे. त्यामुळे आता या संदर्भात अधिवेशनात प्रस्ताव देखील मांडला जाऊ शकतो. या मुद्यावरून भाजप सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हे अधिवेशन फक्त 2 दिवसांचं असल्यानं अधिवेशनावर चर्चा होणार की नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अधिवेशन चालू द्यावा, अशी मागणी केली होती. तर अधिवेशनाच्या आधीपासूनच विरोधीपक्ष आक्रमक झालेला दिसत आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या नेमणूकीवरून देखील गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘दिरंगाईचा खेळ कायमचा थांबवा’; अमित ठाकरे संतापले

चिंता वाढली! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

आता पुण्यातील ‘या’ नव्या रेल्वे स्थानकावरून सुटणार स्वतंत्र रेल्वेगाड्या; 9 जुलैला सुटणार पहिली रेल्वे

मुंबईतील कोरोना आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत घट!

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More