Top News पुणे महाराष्ट्र

बेफिकर लोकांमुळे निर्बंध घालण्याचा सरकार विचार करेल- राजेश टोपे

मुंबई | राज्यात सध्या तरी पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज नाही. मात्र काही लोकांची बेफिकरी वृत्ती पाहिली तर छोट्या प्रमाणात काही निर्बंध घालण्याचा सरकार निश्चितच विचार आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

कोरोनाबाबत इतर राज्यांशी तुलना केल्यास महाराष्ट्रातील परिस्थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्यामुळे राज्यात सध्या तरी लॉकडाऊन पुकारण्याची गरज नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील चाचण्यांचे प्रमाण परत वाढविण्यात येणार असून, टार्गेटींग टेस्टिंग करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, लसीकरणाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. देशात सध्या पाच लसींवर काम सुरु आहे. मात्र लस नेमकी कोणत्या तारखेला उपलब्ध होईल हे आजतरी ठामपणे सांगता येणार नसल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन, मुलाने ट्विट करुन दिली माहिती

“उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ आणि शरद पवारांचा ‘शपा’ असा उल्लेख झाला तर…”

ईडी हे त्यांच्या हातचं बाहुलं झालं आहे- छगन भुजबळ

“हात बरबटलेले नसतील तर ईडीची भीती कशाला?”

“…त्यामुळे भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र शिवसेनेनं त्यांची जात दाखवली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या