शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली | केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. त्यातच आता शेतकऱ्यांसाठी सुपर अॅप सुरू करण्याचे नियोजन केंद्र सरकार करत आहे. शेतकऱ्यांना पीक, उत्पादन आणि पीक काढणीनंतरचे व्यवस्थापन बाजारपेठ आणि पिकांसाठीचा सल्ला इत्यादी सर्व माहिती या सुपर अॅपमध्ये असणार आहे.
स्मार्टफोन आणि देशभरात पोहोचलेली इंटरनेट सुविधा पाहता शेतकऱ्यांसाठी अनेक अॅप लाँच करण्यात येत आहेत. प्रत्येक अॅप हा वेगवेगळी माहिती देण्याकरिता असतो. त्यामुळे वेगवेगळ्या अॅप्सची संख्या वाढली आहे. सर्वंच अॅप मोबाईलमध्ये ठेवणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांसाठी आता केेंद्र सरकार सुपर अॅप ला लॉन्च करत आहे.
शेतीसंबंधित सर्व माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये हवामान, बाजारपेठेचे अपडेटस्, सरकारी योजना, कृषि सेवा आणि देशातील विविध भागांतील शेतीसाठी जारी केलेल्या सल्ल्याची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक अॅप्सचं एकत्रिकरण करून ही सुपर अॅप तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर सुपर अॅपच्या प्रगतीसंदर्भात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये हे अॅप लॉँन्च होण्याची शक्यता आहे. या अॅपमुळे सर्व माहिती शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळू शकते.
थोडक्यात बातम्या-
“काही वर्षांपूर्वीच कोकणातील घाण आपण पळवून लावली”
‘आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला’; अन्यथा…
जिओ ग्राहकांसाठी खुशखबर! फक्त 10 रूपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड वॅलिडिटी आणि…
सर्वात मोठी बातमी ! आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात
पुढच्या टार्गेटवर कोणता मंत्री असणार?, किरीट सोमय्या म्हणाले….
Comments are closed.