कामगारांच्या मुलांचा शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च सरकार करणार; सरकारकडून ही योजना लागू
नवी दिल्ली | आपल्या देशात अनेक सरकारी योजना येतात आणि जातात. काही मोजक्याच लोकांना याबद्दलची माहिती असते. ज्यांच्यासाठी योजना तयार केल्या जातात त्यांना या योजनेबद्दल काडीमात्र माहिती नसते. योजनेचे पैसे देखील खालच्या लोकांपर्यत पोहोचत नाही. आता उत्तरप्रदेश सरकारने एक योजना आणली आहे.
उत्तरप्रदेश सरकारने गरीब कामगारांसाठी अशीच एक योजना तयार केली आहे. यामध्ये गरीब कामगारांच्या मुलांच्या शिक्षणांपासून ते लग्नापर्यंतचा खर्च राज्य सरकार करणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तर यासाठी ‘लेबर कार्ड’ देखील तयार करावं लागणार आहे. यासाठी 18 ते 60 वर्षाच्या वयोगटाच्या व्यक्तींनाच नोंदणी करता येणार आहे.
कुंटूबातील एका व्यक्तीलाच या योजनेसाठी नाव नोंदणी करता येणार आहे. यासाठी आधारकार्ड असणं गरजेचं आहे. बँक खाते, रेशन कार्ड, रहिवासी दाखला यासह इतरही कागदपत्रे लागणार आहेत. ज्या व्यक्तीने एका वर्षात 90 दिवस काम केलं आहे. त्यालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर तेयै व्यक्तिचं कामगार कार्ड काढण्यात येईल.
दरम्यान, केंद्र सरकारकडून देखील गरीबांना ‘लेबर कार्ड’ देण्यात येतं. कोरोना काळात गरीबांना या लेबर कार्ड वरून मोफत रेशनचं धान्य देखील उपलब्ध करून दिलं जात होतं. या योजनेतून हातावर पोट असणाऱ्या गरिब लोकांना लाभ मिळणार आहे. पण ही योजना कितपत यशस्वी होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
थोडक्यात बातम्या-
राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला राज ठाकरेंची चिंता; पत्राद्वारे केली मास्क घालण्याची विनंती
ऑनलाईन सत्र सुरू असताना वकिलाचा कॅमेरा ऑन राहिला अन्…, पाहा व्हिडिओ
बारामतीच्या ‘त्या’ रिक्षाचालकाच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर!
‘कृषी कायदे मागे घेऊन सरकारने माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी’; दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
पोलीस कर्मचाऱ्याच्या छळाला कंटाळुन पत्नीनंतर पतीनेही केली आत्महत्या!
Comments are closed.