Top News पुणे महाराष्ट्र

पीडित महिलेला सरकारतर्फे दहा लाखाची मदत देणार राज्यमंत्री बच्चू कडू

पुणे | काल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ससून हॉस्पिटलमध्ये आपले डोळे गमावलेल्या पीडित महिलेची जाऊन भेट घेतली. त्या महिलेला दिलासा देत महिला बालविकास खात्याच्या मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत दहा लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

मंळवारी 3 नोव्हेंबर रोजी शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील मुक्ता राजू चित्रे या महिलेचा विनयभंग करुन, मारहाण करुन दोन्ही डोळे निकामी केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

मुक्ता चित्रे या मंळवारी 3 नोव्हेंबर रोजी रात्री 9च्या सुमारास शौचास गेल्या होत्या. त्यावेळी तिथे एक नराधम त्यांच्याकडे पाहू लागल्यामुळे तुला बाईमाणुस कळत नाही का? असं मुत्या चित्रे त्या नराधमाला म्हणाल्या.

त्यानंतर त्या नराधमाने मुक्ता चित्रे यांच्यावर हल्ला करत त्यांचा एक डोळा काढला. तर दुसऱ्या डोळ्यालादेखील गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत मुक्ता यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

नोटबंदीचा उत्सव साजरा करणे म्हणजे उद्धवस्त लोकांच्या खडग्यावर बसून वाढदिवसाचा केक कापल्यासारखे; शिवसेना

औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केल्यानं काय साध्य होणार?- अमोल कोल्हे

भाजपाने शिवसेनेला नितीश कुमारांप्रमाणे पाठिंबा दिल्यास स्वीकारणार का?; शिवसेनेने दिले ‘हे’ उत्तर

“पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला बिहारच्या जनतेने पुन्हा नाकारलं”

दिल्लीवर मुंबई भारी; पाचव्यांदा जिंकली आयपीएलची ट्राॅफी!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या