बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, अधिवेशनाचा ‘हा’ पायंडा महाविकास आघाडी मो़डीत काढणार

मुंबई | राज्याच्या धोरणात्मक निर्णयासाठी विधीमंडळ अधिवेशन हे खूप महत्त्वाचं असतं. गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं अधिवेशन घेण्यास अडथळे येत होते. पण आता हिवाळी अधिवेशनाबाबत (Winter session) महत्त्वाची माहिती समोर येत आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन हे मुंबईतच होणार आहे.

कोरोना, मुख्यमंत्र्यांची तब्येत, विधानपरिषद निवडणूक यामुळे अधिवेशन पुढे ढकलण्यात येणार अशी चर्चा होती. पण आता उद्धव ठाकरे यांची तब्येत पण सुधारली असल्यानं अधिवेशन होणार आहे. विधीमंडळ हिवाळी अधिवेशन येत्या 22-28 डिसेंबरदरम्यान भरवण्यात येणार आहे. याबाबत सोमवारी संसदीय समितीची बैठक होणार आहे.

हिवाळी अधिवेशन हे नागपूरला भरवण्यात येतं. तशी परंपरा आपल्या राज्यकर्त्यांनी चालवली होती. पण यंदा सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार हिवाळी अधिवेशन हे मुंबईत घेणार आहे. भाजपकडून मात्र हे अधिवेशन नागपूरला घेण्यात यावं, अशी मागणी करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता सर्व गोष्टींचा विचार सरकार करणार आहे.

दरम्यान, अधिवेशनादरम्यान सभागृहात फक्त आमदारांनाच प्रवेश देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांचे स्विय सहाय्यक यांना परवानगी देण्यात येणार नसल्याचं बोललं जात आहे. दोन डोस घेतलेल्या आमदारांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे. परिणामी येत्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगला सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

थोडक्यात बातम्या 

माझ्या पराभावामागे ‘या’ नेत्याचा हात; मोठं षडयंत्र रचुन मला पाडलं

“वाघावर स्वार होऊन परत पायउतार होणं कठीण, मग वाघच…”

“…तोपर्यंत दाढीतून घरं पडत राहतील, मोदींची दाढी आणि पीएम आवास दोन्ही अमर आहेत”

आता पहिली ते सातवीच्या शाळांचीही घंटा वाजणार, सरकारचा मोठा निर्णय

“साखरेला चांगला भाव मिळतोय, आमच्या ऊसाचा भावही वाढवा”, राजू शेट्टींचा एल्गार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More