महाराष्ट्र मुंबई

राज्यभरातील खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार- राजेश टोपे

मुंबई | अर्धा किलोमीटरसाठी 5 ते 8 हजार रुपये आकारले जातात. त्यामुळे खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. जर कुणी ठरलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारला तर त्याचे लायसन्स रद्द करुन त्याच्यावर गुन्हाही दाखल केला जाणार, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णासाठी आणि इतर आजारांच्या रुग्णांसाठीही रुग्णवाहिकेची लोकांना गरज लागत आहे. पण अशा परिस्थितीत रुग्णवाहिका चालवणारे मोठी किंमत लोकांकडून वसूल करत आहेत. यामुळे खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यातील रुग्णवाहिकांनी प्रति किलोमीटर किती दर आकारायचा हा निर्णय त्या जिल्ह्यातील आरटीओ घेईल. त्यापेक्षा जर कुणी अधिक दर घेतला तर परवाना रद्द करण्याबरोबर गुन्हाही दाखल केला जाईल, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

दरम्यान, ठरवलेल्या दरापेक्षा जास्त दर लावला तर लोकांनी जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर तक्रार करू शकता, असंही राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करणं कठीण, सरकारवर कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते”

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमणार- अमित देशमुख

महत्वाच्या बातम्या-

टिकटाॅक बंद झाल्यानं 2 बायकांसह धुळेकर उद्ध्वस्त; आतापर्यंत इतक्या लाखांची कमाई!

फडणवीसांनी दोन तासात कितीतरी प्रश्न सोडवले असते- चंद्रकांत पाटील

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळींची पोलिसांकडून होणार चौकशी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या