बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हमीभाव दिल्याचा सरकारचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा’; राजू शेट्टींचं आव्हान

मुंबई | खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यास परवानगी दिली आहे. खरीप पिकासाठी सरकारने हमीभावात 50 ते 62 टक्के वाढ केली आहे. त्यावरून आता शेतकरी नेते आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

शेतकऱ्यांसाठी कोणताही योग्य प्रमाणात हमीभाव दिला नसून हा फक्त सरकारचा खोटारडेपणा आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. केंद्र सरकाची घोषणा जुमला असल्याची टीका त्यांनी केली आहे. शेतकरी कोणाकडे भीक मागत नसून घामाचे दाम मागत आहेत, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे. ’60 % हमीभाव वाढवत असल्याची घोषणा सरकारने केली आहे. इतका हमीभाव वाढवत असल्याचा सरकारचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने उत्पादन खर्चाचा विचार करून सिद्ध करून दाखवावा’, असं आव्हान राजू शेट्टी यांनी दिलं आहे.

शेती कसणे महागाईमुळे सोपं राहिलेलं नाही. मशागत, खत, इंधन, बियाणे यांचा भरमसाठ खर्च वाढला आहे. शासनाने हमीभावासंदर्भात घोषणा करताना या वाढलेल्या किंमतीचा विचार केलेला नाही. शेतकरी कोणाकडे भीक मागत नाहीत तर घामाचे दाम मागत आहे. शेतकऱ्याला कायदेशीर हमीभाव दिला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. लाॅकडाऊनमुळे महागाई वाढल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम पेरण्यांवर होताना दिसत आहे.

दरम्यान, भातावरील एमएसपीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर 1868 रुपये प्रतिक्विंटल भात आता 1940 प्रतिक्विंटल झाला आहे. त्यासोबतच बाजरी प्रतिक्विंटल 2150 रुपयांवरून 2250 रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. तूर आणि उडीदसाठी दोन्ही 300 रुपये क्विंटल सर्वाधिक एमएसपी ठरवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा या दृष्टीने एमएसपीमध्ये सरकारने वाढ केल्याचं सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

“मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा”

‘पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी द्या’; शेतकऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा, शिवसेना नसती तर…”

‘या’ वयोगटातील मुलांना मास्कची गरज नाही; वाचा केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More