बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारची कोरोना हाताळण्याची पद्धत चुकीची, प्रसिद्ध शास्त्रज्ञानं दिला राजीनामा

नवी दिल्ली | मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तर दिवसाला चार हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोना विषाणूच्या धोक्याची किंवा दुसऱ्या लाटेची पूर्वकल्पना केंद्र सरकारला देण्यात आली होती. पण सरकारची कोरोना स्थिती हाताळण्याची पद्धतचं चुकीची असल्याचा आरोप करत प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार शास्त्रज्ञांच्या फोरममधून राजीनामा दिला आहे.

संबंधित फोरम कोरोना विषाणूच्या विविध व्हेरिएंट्सचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आली होती. या फोरममध्ये देशातील प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आला होता. कोरोना साथीच्या लढ्यात केंद्र सरकारच्या नियोजनावर आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर जमील मागील काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित करत होते. मात्र, सरकारकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्यानं विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार समितीतून राजीनामा दिला आहे, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

वैज्ञानिकांची ही फोरम जैव प्रौद्योगिक विभागाच्या अंतर्गत येते. या मंत्रालयाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी अजून तरी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या फोरमनं केंद्राला अगोदरच पूर्वकल्पना दिली होती की, मार्च महिन्यात कोरोना विषाणूची नवीन लाट येईल. यामुळे मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढेल. परिणामी कोरोना संसर्गाचा वेग वाढून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येईल. पण केंद्र सरकारनं सल्लागारांच्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे देशाला मार्चपासून कोरोना विषाणूचा तीव्र फटका बसला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. तसंच देशात वैद्यकीय साठ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विरोध पक्षांसह सामाजिक कार्यकर्ते आणि बुद्धीजीवी लोकं केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

थोडक्यात बातम्या

नवऱ्यानं केली नसबंदी, त्यानंतर पत्नी प्रेग्नंट राहिल्यानं छळ, तपासात धक्कादायक माहिती समोर

कोरोनामुळे पत्नीला आलं टेन्शन, पतीनं केलं असं काही की पोलिसांनी केली अटक

वातावरण बदलतंय, कोरोनासोबत डेंग्यूचाही धोका वाढतोय; अशी घ्या स्वत:ची काळजी!

“मोदीजी, आमच्या लेकरांची लस परदेशात का पाठवली?”; देशव्यापी मोहीम सुरु

अवघ्या 100 रुपयांसाठी दाम्पत्याने मिळून केली युवकाची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More