बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”

मुंबई | नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सध्या राज्यात नेत्यांच्या दौऱ्यांचा पूर आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी राज्यपालांबरोबर भाजपचे निलंबित आमदार आशिष शेलार हे देखील होते. राज्यपालांच्या या दौऱ्यावरूनच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल नेहमीच घटनेचं पुस्तक वाचून काम करतात. राज्यपालांचं पुस्तक पुराच्या पाण्यात वाहून गेलं का ते मला पाहावं लागेल, असा टोला राऊतांनी राज्यपालांना लगावला आहे. तसेच राज्यपाल विधानसभेचं अस्तित्व मानायला तयार नसल्याचं देखील राऊतांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, विधीमंडळात काही आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला, राजदंडाला हात घातला. आमदारांचे हे वर्तन घटनाबाह्य असल्यानं विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र, राज्यपाल विधानसभेचे अधिकार मानायला तयार नाहीत असं दिसतंय.

तसेच घटनेने दिलेले अधिकार आणि विधानसभेचं अस्तित्व जर राज्यपाल मान्य करत नसतील तर त्यांच्यावर सरकार काय कारवाई करते ते पाहावं लागेल, असं देखील राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे. राऊतांच्या या टोल्यानंतर आता विरोधी पक्षातील नेते काय बोलणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”

…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’

पूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…

मोठी बातमी! राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More