Top News देश

राज्यपाल काही फक्त भाजपचे नाहीत ते महाराष्ट्राचेही आहेत- संजय राऊत

नवी दिल्ली | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून ठाकरे सरकार जोरदार टीकास्त्र सोडलंय. राज्यपालांना विमान प्रवास नाकारण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अपॉईंट करतात, असं म्हणत फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे. याला शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जे काही झालं ते नियमाला धरूनच झालेलं आहे. भाजपच्या लोकांनी आरोप करण्याची गरज नाही, राज्यपाल काही भाजपचे नाहीत ते महाराष्ट्राचे आहेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे.

सरकारने राज्यघटनेतील नियमांचं पालन करणं हा अहंकार आहे का?, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थीत केला आहे. राज्य सरकारने 12 नियुक्त आमदारांची राज्यपालांकडे शिफारस केली आहे. मात्र अजूनही बारा आमदारांच्या नियुक्त्या होत नाहीत.  हा राज्यघटनेचा सर्वात मोठा अपमान आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

परळीच्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील ‘तो’ मंत्री कोण?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

“…म्हणून त्यांनी अमित शहांना बोलवून शिवसेनेला संपवण्याची सुपारी दिली”

हिंदी चिनी पुन्हा भाई-भाई!; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची संसदेत मोठी घोषणा

पंढरपुरात पुन्हा रणधुमाळी… राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला?, भाजपच्या हालचाली वाढणार???

आता बक्कळ पैसे वाचणार; पेट्रोलशिवाय चालणाऱ्या ‘या’ गाड्या लवकरच बाजारात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या