बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यपाल इज बॅक, भगतसिंह कोश्यारींना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई | एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसेनेत झालेल्या उलथापालथीमुळे अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळं राज्यपाल आता पुन्हा सक्रीय होणार आहेत. आता ते काही महत्वाचे निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा करतील. राज्यपाल सध्याच्या या स्थितीवर वेट आणि वॅाचची भूमिका घेणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान या राजकीय घडामोडीबद्दल जाणून घेण्यासाठी राज्यपाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनकरून त्यांच्याशी चर्चा करू शकतात. आता राज्यपाल आगामी काळात काय निर्णय घेतील यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.  राज्यपालांनी कोरोनावर आता मात केली आहे. उपचाराअंती आता राज्यपाल कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे.

थोडक्यात बातम्या 

“हिम्मत असेल तर राजीनामा देऊन परत निवडणूक लढवून दाखवा”

‘कब तक छीपोगे गोहाटीमे’; झिरवळांचा फोटो शेअर करत राऊतांनी आमदारांना डिवचलं

संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांचा डुक्कर असा उल्लेख, म्हणाले…

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

‘यावर्षी योग्य माणसाच्या हस्तेच विठ्ठलाची पूजा’; भाजप खासदाराचं सूचक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More