बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यपालांच्या डोक्यावरील टोपी ही विद्वत्तेची, त्यांनी विरोधकांचं थोबाड फोडलं पाहिजे

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपुर्वी महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित 2 दिवसीय विधीमंडळ अधिवेशन बोलावलं होतं. आज मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. संसदेचं 4 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रानंतर भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावत भाजपवर हल्लाबोल केला आहे. अशा प्रकारचं पत्र लिहून ते मीडियाकडे लीक करण्याची गरज नाही. विशेष अधिवेशन कशासाठी बोलवायचं आहे? असं काय घडलं आहे महाराष्ट्रात? राज्यपाल हे राज्याचे पालक असतात. त्यांनी राज्याची बदनामी करू नये. घटकात्मक पदावर राज्यपाल जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते राज्याचे कुटूंबप्रमुख आहेत. जर राज्याची बदनामी होत असेल तर, त्याला राज्यपालांनी विरोध केला पाहिजे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपचे लोक राज्यात विरोधी पक्षात आहेत. विरोधी पक्षातील लोक सरकारवर चिखलफेक करत आहेत. राज्यपाल हे जेष्ठ व्यक्ती आहेत, त्यांनी विरोधकांचं थोबाड फोडलं पाहिजे. राज्यपालांच्या डोक्यावरील टोपी ही विद्वत्तेची टोपी आहे. राज्यपालांनी विरोधी पक्षाचे कान उपटले पाहिजेत. पण, राज्यपाल हे विरोधकांना उत्तेजन देत आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपशासित राज्यात सर्व काही आलबेल आहे का? इतर राज्यात काही घडतच नाही का? मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सर्व आकडे दिले आहेत. बाकी राज्यात काय सुरू आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यपालांनी आ बैल मुझे मार असं केलं आहे. झाकली मुठ सव्वा लाखाची होती. आम्ही मुठ उघडली आहे, अजून मुठ उघडायला लावू नका, असा इशारा राऊतांनी भाजपला दिला आहे.

थोडक्यात बातम्या –

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बसणार चाप, आता होणार थेट वाहन जप्तीची कारवाई!

“…तर कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या कानशिलात दोन हाणाव्यात”

सोमय्यांच्या अडचणी वाढल्या??, 72 तासांनंतरही माफी न मागितल्याने परबांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

“शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, त्यांना पक्षातून काढण्यात आलं”

“अनंत गीते काही चुकीचं बोलले नाहीत, ही आघाडी…”; नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More