बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘​​द ग्रेट खली’च्या आई तांदी देवी यांचं निधन

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि WWE चा माजी चॅम्पियन  दलीपसिंग राणा उर्फ ​​द ग्रेट खलीच्या आई तांदी देवी यांचं निधन झालं आहे. बर्‍याच दिवसांपासून त्यांच्यावर पंजाबच्या लुधियानाच्या रूग्णालयात उपचार चालू होते. मात्र अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या अनेक दिवसांपासून तांडी देवीची प्रकृती खालावत चालली होती. यामुळे त्यांना 14 जून रोजी लुधियाना येथील दयानंद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल केलं होतं. डीएमसी रुग्णालयाच्या पीआरओने खलीच्या आईच्या मृत्यूची माहिती दिली. त्याने सांगितलं की एकापेक्षा जास्त अवयव निकामी झाल्यामुळे त्याच्या आईचा मृत्यू झाला.

खलीचा मोठा भाऊ मंगल राणानेही यांनी आपल्या आईच्या मृत्युबाबत माहिती दिली. आमच्या आईचं निधन झालं असून सोमवारी झाला असून अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं मंगल राणा म्हणाले. हिमाचल प्रदेशातील सिरमूर जिल्ह्यातील खलीचे मूळगाव धिरैनामध्ये सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

जगामध्ये खली नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कुस्तीपटूचं नाव दिलीप सिंग राणा आहे.  2006 ते 2014 मध्ये तो ‘डब्ल्यूडब्ल्यूई’मध्ये खेळत होता. त्यासोबतच त्याने हॉलिवूडमधील चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ ठिकाणी देशभक्तीपर गीतांच्या तालावर 100 लोकांनी सलग दोन तास केली योगासने

36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही; मराठा क्रांती आंदोलनाबद्दल संभाजीराजेंचं मोठं विधान

“काँग्रेस अन् राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे त्यांनी लक्षात घ्यावं”

मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार?; विजय वडेट्टीवार यांनी दिली महत्वाची माहिती

“अजितदादा शरद पवारांचं ऐकत नाहीत हे मला माहित होतं, पण आता…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More