बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नानंतर कोरोनाची बाधा, नवरदेवाची आठवडाभर मृत्यूशी झुंज, नियतीने घात केलाच

भोपाळ | मध्य प्रदेशात सध्या विवाह आणि सामूहिक कार्यक्रमांवर बंदी आहे. मात्र काही लोक सरकारच्या निर्बंधांना केराची टोपली दाखवत चोरुन विवाह करत आहेत. मध्य प्रदेशात विवाह समारंभ नवरदेवाच्याच जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील पचोर शहरातील अजय शर्मा याचा विवाहाच्या चार-पाच दिवसानंतर कोरोनाने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजय शर्माचा25 एप्रिल रोजी सिहोर येथे विवाह संपन्न झाला. कोरोना नियमांचे पालन करीत एका मंदिरात मर्यादित लोकांमध्ये हा विवाह पार पडला. विवाहाच्या चार-पाच दिवसानंतर अजयला त्रास जाणवू लागला आणि शेवटी 29 एप्रिल रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

पॉझिटिव्ह आल्यानंतर अजयवर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावत चालल्याने त्याला भोपाळला हलवण्यात आलं. भोपाळच्या रुग्णालयात एक आठवडा अजय व्हेंटिलेटरवर होता. मात्र अखेर अजयचा मृत्यू झाला. अजयची वहिनीही कोरोना पॉझिटिव्ह असून कुटुंबातील बाकी सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना प्रोटोकॉलनुसार तरुणावर भोपाळमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये अशीच घटना घडली होती. कोरोनाची लागण झालेल्या नवरदेवाचा लग्नानंतर अवघ्या तीन दिवसात मृत्यू झाला होता. संबंधित मृत वराचं नाव अर्जुन असं होतं.

थोडक्यात बातम्या- 

20 हजार विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात मोठी संधी; राज्य सरकारचा अभिनव उपक्रम

राजकीय स्वार्थासाठी देशाची बदनामी करण्याचा काँग्रेसचा डाव उघड- चंद्रकांत पाटील

लसीकरणाबाबत रोहित पवारांनी मोदी सरकारला दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले…

मोदी सरकारचं मोठं पाऊल, नवं चॅनल सुरु करणार!

“देवेंद्र फडणवीसांनी राज्यभर फिरण्यासाठी ई-पास काढलाय का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More