बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या साडेसात हजारांवरून थेट 3 हजारांवर

नागपूर | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यात पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने कडक लॉकडाऊन देखील जाहीर केला आहे. नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत होती. पण आता नागपूरमधून दिलासादायक गोष्ट समोर आली आहे.

नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं चित्र गेल्या 24 तासात पाहायला मिळालं. गेल्या 24 तासात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट होऊन 3104 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात नागपूरमधील कोरोना रुग्णसंख्या ही 7 हजारांनी वाढत असल्याचं पाहायला मिळत होतं.

परंतु, आता नागपूर जिल्ह्यात एक प्रकारे दिलासादायक वातावरण पसरलं आहे. कारण शहरात एकूण 1614 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ग्रामीण भागामध्ये 1479 रुग्णांची नोंद गेल्या 24 तासात झाली आहे. तर नागपूरमध्ये गेल्या 24 तासात 73 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नागपूरमध्ये एकाच दिवसात तब्बल 6 हजार 644 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या नागपूरमध्ये 54 हजार 732 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णसंख्या आहे. लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात जोर धरू लागल्याने हळूहळू रुग्णांचा आकडा कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

‘प्राण कंठाशी आलेल्या लोकांना वाली कोण?’; सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर कडाडून टीका

दिलासादायक! मुंबईतील कोरोनाबाधितांंच्या संख्येत घट; कोरोनामुक्तीचा दर 91 टक्यांवर

ऑक्सिजनसाठी अशोक चव्हाणांकडे 15 लाखांची मागणी; चव्हाणांचा थेट नितीन गडकरींना फोन

‘या’ जिल्ह्यात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाची लागण

पुण्यात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य; आजपासून मिळणार लसीचा दुसरा डोस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More